वैजापूर (प्रतिनिधी- खाजा पटेल)- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा म्हस्की येथे विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकाचे दि.१६ वाटप करण्यात आले. वर्ग १ते८वी चे विद्यार्थ्यांना मा.शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शेख शफीक पटेल व उपसरपंच शेख युसुफ पटेल मुख्याध्यापक ए.एम.गंडे व शा.व्या.स.सदस्य श्री.बारसे .प्रा.प.श्री.लव्हाले सर.व्यावहारे सर.भडके सर देवरे सर.जाधव सर.श्रीमती चव्हाण मॅडम व पालक महिला उपस्थित होत्या. पाठ्यपुस्तक त्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना कोरोना बाबत माहिती दिली. मास्क लावणे योग्य अंतर ठेऊने मागील वर्षाचे जूने पाठ्यपुस्तके परत घेण्यात आले. मागील वर्षाचे निकाल पञक वाटप करण्यात आले. वर्ग १ला आॅनलाईन प्रवेश बाबत लिंक पाठवण्यात आलेली आहे वर्ग ६ वा ते८ वी आॅनलाईन अभ्यासक्रम श्री. जाधव सर घेत आहे. शाळा सुरू करण्याचे आदेश कोरोनामुळे नाही परंतु विद्यार्थ्यांचा अभ्यास घरी चालू रहावा या हेतूने मोफत पाठ्यपुस्तके वाटप शालेय समिती अध्यक्ष शेख शफीक पटेल यांच्या हस्ते करण्यात आले.