जळगाव : जिल्ह्यात स्वॅब घेतलेल्या कोरोना संशयित व्यक्तीचे तपासणी अहवाल आज प्राप्त झाले असून त्यात जिल्ह्यातील ५० व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.
पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहरातील १, भुसावळ ४, अमळनेर ०, यावल ६, एरंडोल १, तसेच जामनेर ३, जळगाव ग्रामीण १, रावेर १७,पाचोरा ७, भडगाव १, धरणगाव १, पारोळा ०, चाळीसगाव ४,मुक्ताईनगर १, चोपडा ३, जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या ९५७ इतकी झाली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधित रूग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्ह्याच्या चिंतेत वाढ होत आहे.