चाळीसगाव (प्रतिनिधी)- चाळीसगाव येथे दिनांक 27 रोजी काही समाजकंटकांनी चाळीसगाव येथील आदिवासी कोळी महासंघाच्या घाट रोड येथील कार्यालयावर भ्याड हल्ला करून कार्यालयाचे मोठे तोडफोड करून नुकसान केले तसेच कोळी समाजाचे आराध्य दैवत महर्षी वाल्मिक ऋषी यांच्या प्रतिमेची विटंबना केली आहे त्यामुळे कोळी समाज बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत असे घाणेरडे कृत्य करणाऱ्या समाज विद्रोही समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्याबाबत चाळीसगाव येथील डी वाय एस पी कैलास गावडे साहेब, शहर पोलीस स्टेशनचे पीआय विजयकुमार ठाकुरवाड यांना कोळी महासंघ व कोळी समाज बांधव यांच्याकडून निवेदन देण्यात आले निवेदनावर जयश्री कैलास मोरे, किशोर रायसाकडा, किशोर शेवरे, दीपक काकडे, संतोष कोळी, उमेश कोळी, अमोल कोळी नाना कोळी, गुलाब मोरे, आधी समाजबांधवांच्या सह्या आहेत.