जळगाव – जामनेर तालुक्यातील पळासखेडा बु. गावात कोरोनाचा आज पहिला रुग्ण आढळून आला असून सदर रुग्ण पोलीस कर्मचारी असल्याचे समजते.
सदर पोलीस कर्मचारी मालेगाव चाळीसगाव सीमेवर कार्यरत होते. प्रशासनाच्या वतीने गाव सील करण्यात आले आहे.
तालुक्यात प्रथमच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने चिंता व्यक्त होत आहे. प्रशासनाने नागरिकांना घाबरून जाऊ नये, काळजी घ्या असे अवाहन केले आहे.














