वरणगावं(प्रतिनिधी):- महाराष्ट्र राज्य विजवितरण कंपनीने उद्या 132 सबस्टेशन वर फिडर दृस्ति साठी लोडशेडिंग करणार आहे त्यात काल दि 14 मे गुरुवार रोजी 18 तसापासून कठोरा जॅकवेल वरील लाईन बंद होती त्यामुळे वरंनगाव शहरातील पाणी पुरवठा बंद असल्यामूळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात ताण निर्माण झाला आज नगराध्यक्ष सुनील काळे उपनगराध्यक्ष शेख आखलाक तिथे स्पॉस्ट वर गेले पाणी पुरवठ्यावर ची लाईन भुसावळ सबस्टेशन वरून सुरू करण्याचा आग्रह केला त्यानुसार अधिकारी सावळे,विलास तायडे यांच्या टीम ने कठोरा येथून वरंनगाव पाणी पुरवठा योजना व 5 गावाची सामूहिक पाणी पुरवठा योजनेवरील पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी भुसावळ सबस्टेशन वरून (लाईन) वीज प्रवाह तात्काळ जोडला आणि लाईन सुरू केली 11 वाजता तब्बल 18 तासांनी पाणी पुरवठा सुरळीत झाला तसेच 132 केव्ही सबस्टेशन ला नगराध्यक्ष यांनी जाऊन उपअभियंता श्री महाजन यांच्या कडे जाऊन दि 16 मे शनिवारी फिडर दृस्ती साठी लोड शेडिंग करण्याचा आदेश महाराष्ट्र वीज वितरण कंपनीने काढला होता मात्र अजून शनिवारी लोडशेडिंग झाली असती तर पाणी पुरवठा योजनेवरील पाणी बंद होणार आहे म्हणून नगराध्यक्ष सुनील काळे यांनी शनिवारी सकाळी होणारी लोडशेडिंग करू नये अशी मागणी कार्यकारी अभियंता श्री महेश पाटील , उपकार्यकारी अभियंता श्री एस गांजरे 132 केव्हीचे उपअभियंता श्री महाजन यांच्याकडे कडे जाऊन शनिवारची लोडशेडिंग करू नये अन्यथा जनतेला नाहक त्रास होईल त्याकरिता जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका असे नगराध्यक्ष सुनील काळे यांनी अधिकाऱयांना विनंती केली त्यामुळे उद्या लोड शेडिंग करणार नसल्याचे उपअभियंता श्री महाजन यांनी आश्वासन दिले.