बोदवड (प्रतिनिधी): देशहसह महाराष्ट्रात कोरोना महामारीने जागतिक थैमान घातले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून संपुर्ण भारतात लोकडाऊन करण्यात आले. आहे. व महाराष्ट्रात सर्व व्यापार, व्यवसाय बंद असल्याने पराज्यातील कामगार मोठ्या प्रमाणात आपापल्या राज्यात परत जात आहे. व प्रवासासाठी वाहनांची व्यवस्था नसल्याने पायी चालत हे कामगार आपल्या राज्यात जात आहे. त्या पार्श्वभूमीवर या पायी जाणाऱ्या कामगारांना बोदवड येथील शासकीय रुग्णालयातील डॉक्टर व अन्य कर्मचारी वर्ग मदतीस धावून आले व या डॉक्टर व कर्मचारी वर्गाकडून या परराज्यातील कामगारांना चिवडा, अनेक खाद्यपदार्थ व पेय वाटप करण्यात आले आहे.
सर्व व्यापार, व्यवसाय बंद असल्याने पर राज्यातील बहुसंख्य कामगारांवर उपासमारीची वेळ आली असल्याने पर राज्यातील मजूर वर्ग मोठ्या प्रमाणात आपापल्या राज्यात परत जाताना दिसून येत आहे. व त्यांना आपल्या राज्यात परतण्यासाठी वाहनांची व्यवस्था नसल्याने मोठ्या प्रमाणात औरंगाबाद, पुणे,नाशिक वरून पायी चालत हे कामगार मध्यप्रदेश, झारखंड या आपल्या राज्यात परत जात आहे. व दररोज शेकडो कामगार बोदवड शहरात पुणे,नाशिक,औरंगाबाद कडून रोज चालत येत असताना दिसून येत असल्याने त्यांना बोदवड येथील शासकीय रुग्णालयातील डॉक्टर व अन्य कर्मचारी वर्गाने आपल्या स्वखर्चाने या कामगारांना खाद्यपदार्थ, चिवडा पेय वाटप करून कामगारांची भूक भागवुन समाजकार्य केले.
त्यावेळी पुणे,नाशिक,औरंगाबाद कडून पायी चालत आपल्या राज्यात येणाऱ्या परप्रांतीय कामगारांना वाडीकिल्ला येथे खाद्य पदार्थ वाटप करतांना बोदवड शासकीय रुग्णालयातील डॉक्टर अमोल,राजेश,संतोष,डॉक्टर एजाज व अन्य शासकीय रुग्णालयातील कर्मचारी वर्ग उपस्थित होते.