जळगाव, (प्रतिनिधी)- कोरोनाच्या वाढता पादुर्भाव लक्षात घेऊन संपूर्ण देश लोकडाऊन करण्यात आलेला आहे. तरी गरीब मोल-मजुरांचे स्थलांतराचा निर्णय सरकारने घेतला त्या पाश्वभुमीवर व दीड महिन्यापासून हाताला काम नाही जवळ पैसा नाही खाण्यापिण्याचे वांदे त्यात घरभाडे थकल्याने मालकाचे बोलणे खावे लागते तसेच शहर सोडण्यासाठी रेल्वे,रस्ते बंद वाहने नाहीत अशा परिस्थितीत इतर राज्यातील व जिल्ह्यातील लोक त्यांच्या मूळ गावी स्थलांतरित होताना दिसत आहे बरेच लोक महामार्गावरून आपल्या परिवारासोबत डोक्यावर ओझे घेऊन निघाले आहेत.कित्येकांनी किती व काय किलोमीटर अंतर पार करून आपल्या मूळ गावी जाताना दिसत आहे त्याच दृष्टिकोनातून धर्मरथ फाउंडेशन तर्फे गंधर्व कॉलनी,राष्ट्रीय महामार्ग क्र.६ च्या जवळ त्यांच्यासाठी थंड पाण्याची सोय व त्यांना ऊर्जा मिळण्यासाठी अल्पोहार याची होय करण्यात आलेली आहे. तरी परिसरातुन व शहरातुन या स्तुस्त उपक्रमाला फार मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद लाभत आहे.यावेळी उपस्तीत धर्मरथ फाउंडेशनचे संस्थपक अध्यक्ष विनायक पाटील,डॉ.शाम तोष्णीवाल,दीपक गुप्ता,प्रवीण पाटील,सोनू सातव हे होते.