मुंबई: विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपने आपले चार उमेदवार जाहीर केले असून विधानपरिषदेसाठी भाजपने माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर, नागपूरचे माजी महापौर प्रवीण दटके आणि नांदेडचे डॉ. अजित गोपछेडे यांना उमेदवारी जाहीर करून शर्यतीत असलेल्या उत्सुक जेष्ठ व एकनिष्ठ नेत्यांना पुन्हा धक्का देत, निष्ठावंतांना पुन्हा एकदा डावलल्याचं चित्र आहे. दरम्यान, विधानपरिषदेसाठी चर्चेत असलेले एकनाथ खडसे यांना पक्षानं पुन्हा संधी नाकारली आहे. त्याचबरोबर भाजपने पंकजा मुंडे, एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, प्रकाश मेहता यासारख्या नेत्यांच्या विधानपरिषद मध्ये जाण्याच्या मार्गाला ब्रेक लावला आहे
पुन्हा नाराजी सत्र
भाजपच्या जेष्ठ व एकनिष्ठ असलेल्या नेत्यांना पुन्हा एकदा डावलल्याने नेत्यांसह कार्यकर्तांमध्ये नाराजीचा सुरु उमटत आहे. विधानसभेला देखील अशाच पद्धतीने काही जेष्ठांना तिकीट नाकारल्याने भाजपच्या जागा घटल्या होत्या. विधानपरिषद निवडणुकीत डावलेल्या नेत्यांचे पुनर्वसन होईल अशी आस कार्यकर्त्यांमध्ये होती मात्र या वेळी देखील या जेष्ठांच्या पदरी निराशा आली आहे.