यावल – तालुक्यातील किनगाव खुर्द ग्रामपंचायत च्या वतीने गावात विषाणूजन्य आजाराविषयी जनजागृती करण्यात येत आहे तर 14 व्या वित्त आयोगाच्या निधीतून गावात नागरिकांमध्ये सॅनिटायझर व माक्स वितरण करण्यात आले आहे.
नागरिकांनी घराबाहेर निघतांना प्रत्येक नागरिकांनी माक्सचा वापर करावा असे आवाहन देखील करण्यात आले माक्सचे वितरण करताना सरपंच भुषण पाटील ,उपसरपंच शरद अडकमोल, ग्रामपंचायत सदस्य अनिल पाटील ,बबलूकोळी,सिताराम भिल ,श्रावण कोळी ,माजी पचायत समिती सदस्य रवींद्र ठाकूर ,शिरीष तायडे ,यशवंत पाटील ,विनोद कोळी ,यांच्या उपस्थितीत घरोघरी जाऊन वाटप करण्यात आले.