अमळनेर – येथील अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती पदाचा उदय वाघ यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या सभापतीपदी प्रफुल पाटील यांची निवड घोषीत करण्यात आली .
यावेळी झालेल्या निवडणुकीत प्रफ्फुल्ल पाटील यांना १६ पॆकी १२ मते पडली . यावेळी १७ संचालकांमधील उदय पाटील वगळता १६ संचालक उपस्थित होते .यावेळी आ. स्मिता वाघ,माजी आमदार साहेबराव पाटील,जळगाव भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव पाटील
आदींनी प्रफुल्ल पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. चुरशीच्या लढाईत प्रफुल पाटील यांचा विजय झाल्याने पुन्हा एकदा उदय वाघ यांचा बाजार समितीत दबदबा असल्याचे सिद्ध झाले आहे .