जळगाव, (प्रतिनिधी)- जिल्हाभरात उद्या दि. 5 मे पासून मद्य विक्रीला परवानगी असणार असल्याची जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
यापूर्वी 17 मे पर्यंत जिल्ह्यातील मद्य विक्रीला परवानगी नाकारली होती मात्र आता जिल्ह्यातील वाईनशॉप यांना मद्य विक्रीची परवानगी देण्यात येणार असून यासाठी दुकान मालकांना व ग्राहकांना काही सूचना पाळाव्या लागणार आहे. बियरबार यांना मात्र अद्याप परवानगी नाही. जिल्ह्यातील मद्यविक्रीच्या परवानगीने तळीरामांचा प्रश्न मार्गी लागला आहे.