वरणगावं(प्रतिनिधी:- वरणगांव फॅक्टरी चे सुरक्षा विभागातील दरबान मेन हाॅस्पीटल पाॅईंटजवळ आपल्या सुरक्षेसाठी ड्युटी करत असताना ओमनी गाडी तुन आलेल्या गुंडांनी सुरक्षारक्षकां मारहाण करून जीवघेणा हल्ला केल्याची घटना १ मे रोजी सकाळी चार वाजेच्या सुमारास घडली याबाबत अधिक माहिती अशी की वरणगाव फॅक्टरी येथील सुरक्षा विभागात काम करणारे श्री.मनोज अहिरराव व श्री.शांताराम जोहरे आपली ड्युटी बजावत असतांना हतनुर कडून आलेल्या एका अज्ञान ओमनी व्हॅनमध्ये चालकासहीत . पाच गुंड प्रवृत्तीचे व्यक्ती तेथे आले त्यांनी आम्हास. फॅक्टरी इस्टेट मध्ये जाऊद्या असे सांगितले परंतु सुरक्षारक्षकांनी तुम्हाला प्रवेश दिला जाणार नाही असे सांगितले असता, गाडीत काय ठेवले हे बघण्यासाठी सुरक्षारक्षकांनी प्रयत्नही केला त्यावेळेस यातील गुंडांनी यांच्या डोळ्यात मिरची पावडर फेकून जीवघेणा हल्ला चढवला हॉकी स्टीक ने मारहाण केली व मारहाण केल्यानंतर ते आलेल्या मार्गाने परत फिरले, सुरक्षारक्षकांची बॅटरीची व काठीची मोडतोड गुंडांनी केली असून सुरक्षा रक्षकावर जीवघेणा हल्ला झालेला आहे . सुरक्षा रक्षकाकडे बॅटरी व काठी व्यतिरिक्त काहीही हत्यार नसते व अशाप्रकारे हे सुरक्षा रक्षक जीव मुठीत धरून आपले कर्तव्य बजावत असतात सदरच्या गाडीमध्ये गुटखा किंवा दारू असल्याचे शंका व्यक्त होत असून या जीवघेण्या हल्ल्याचा सर्वत्र निषेध होत आहे, सदरच्या सुरक्षारक्षकांना वरणगाव फॅक्टरी च्या रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आलेले आहे या घटनेने सुरक्षारक्षक यामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे घटना घडल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविले असता कर्नल अनिल मंकोटिया तसेच सुरक्षा विभागाचे कनिष्ठ कार्य प्रबंधक एन पी वाघ, एल पी इंगळे, कामगार संघटनांचे पदाधिकारी आदींनी घटनास्थळी भेट दिली सदरची घटना पोलीस स्टेशनला कळविले असता पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी येऊन त्यांनी योग्य होऊन पंचनामा केला आहे .