बोदवड ,दि.28(प्रतिनिधी) – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बोदवड नगर पंचायत हद्दीत दि. 1 ते 3 मे असे तीन दिवस पूर्णपणे बंद ठेवण्याचा आदेश नगरपरिषदचे मुख्याधिकारी यांनी आज काढले आहे.
या दोन दिवसाच्या बंदच्या काळात शहरातील कुठलेही दुकान, आस्थापना, पेट्रोल पम्प, ग्राहक सुविधा केंद्र, बँका, फळ, भाजीपाला दुकाने सुरु राहणार नाही. तसेच या काळात कुठल्याही कारणासाठी नागरिकांना घराबाहेर पडता येणार नाही. मेडिकल मात्र यावेळी सुरु राहणार आहेत तर दूध डेअरी सकाळी 7 ते 9 व संध्याकाळी 5 ते 7 या वेळेत उघडी राहणार आहे. सदर 72 तास संपूर्ण शहर पूर्णपणे लॉकडाऊन राहणार आहे.तरी लॉकडाऊन उल्लंघन केल्यास दंड व फौजदार गुन्हा दाखल करण्याचे आदेश आज बोदवड नगरपरीषदचे मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले यांनी जारी केले आहे.