जळगाव – येथील पिंप्राळा परिसरात (प्रभाग क्र.९) मधील गरजू परिवारांना मोफत धान्य वाटपास आज माजी मंत्री आ.गिरीशभाऊ महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली आज खासदार उन्मेशदादा पाटील, आमदार राजुमामा भोळे, महापौर भारतीताई सोनवणे उपमहापौर अश्विनभाऊ सोनवणे,भाजपा महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले.या बाबत सविस्तर माहिती अशी की सध्याच्या कोरोना आजाराशी मुकाबला करतांना शेकडो परिवारांना आपला रोजगार बंद असल्याने किराणा व अन्नधान्य मदतीची गरज असून या अनुषंगाने (प्रभाग क्र.९)पिंप्राळा व परिसरातील अशा गरजू परिवारांना सामाजिक बांधिलकी जपून अन्नधान्य वाटपाचा कृतिशील उपक्रमास कोठारी ज्वेलर्सचे संचालक महेंद्रभाई कोठारी , सौरभभाऊ कोठारी,माजी नगरसेवक आबासाहेब कापसे , नगरसेविका प्रतिभा कापसे व नगरसेवक मयूर कापसे यांच्या वतीने आज शनिवार पासून सुरुवात करण्यात आली आहे.
या माध्यमातून प्रभाग क्र.९ मधील २००० गरजू कुटुंबांना धान्य वितरण करण्यात येणार असून आज कष्टभंजन वीर हनुमान मंदिर, शंकर अप्पा नगर, पिंप्राळा येथे सोशल डीस्टंसिंगचे नियम पाळून, तोंडाला मास्क/रुमाल बांधून मान्यवरांच्या हस्ते अन्नधान्य वितरणास सुरुवात करण्यात आली. सदरील कार्यक्रमाप्रसंगी कुलभूषण पाटील, नगरसेवक विजय पाटील ,अतुल बारी,शफी भाई,आबासाहेब सोनार,रघुनाथ पाटील,दिलीप पाटील, डॉ.कैलास पाटील,दगडू अप्पा,प्रताप पाटील,साहेबराव पाटील, भास्कर आबा,मनोहर अप्पा,नागराज पाटील,श्री.पवार बाबा,रवि पाटील, कष्ट भंजन वीर हनुमान मित्र मंडळ व जय हिंद मित्र मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
*उपक्रमाचे खासदारांनी केले कौतुक*
माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगीतल्याप्रमाणे देशात कोणीही भुकेला राहू नये या आवाहनाला अनुसरुन आजच्या कोरोनाच्या महामारीच्या प्रसंगात आपण ज्या परिसरात राहतो किमान त्या परीसरापूरते तरी दातृत्व दाखविण्याची गरज आहे.यातून कोणीही अन्नधान्यावाचून भुकेला राहू नये . यासाठी अशा कृतिशील उपक्रमाची गरज असून कोठारी व कापसे परिवाराने दोन हजार लोकांपर्यत दिलेला मदतीचा हात कौतुकास्पद आहे. या परिवाराचे मी मनापासून कौतुक करतो.असे गौरवोद्गार यावेळी केंद्रीय पेट्रोलियम प्राकृतिक गॅस तसेच सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाचे स्टँडिंग कमिटी सदस्य खासदार उन्मेश दादा पाटील यांनी व्यक्त केले आहे. प्रत्येकाने आजवर लॉकडाऊनला सर्वांनी सहकार्य केले असून यापुढे ही घरीच रहा सुरक्षित रहावे असे आवाहन त्यांनी केले.