पाचोरा,(प्रतिनिधी) येथील वरखेडी रोड वरिल हाॅटेल रविराज बिअर बार च्या मद्य साठ्यात मोठ्या प्रमाणात तफावत आढळून आल्याने काल रात्री उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई करत “बार सील”करून या प्रकरणी विभागीय गुन्हा दाखल केला असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी श्री.माळी यांनी “नजरकैद “शी बोलतांना सांगितले.
रविराज बिअर बारचे संचालक हे लॉकडाऊन कालावधीत देखील हाॅटेल मधील मद्य साठा हाॅटेल समोरच्या एका घरात साठवणूक करून जास्त दराने विक्री करित असल्याचे पाचोरा पोलीसांना मिळुन आल्याने या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क चे श्री.माळी यांना कळविण्यात आले. श्री.माळी यांनी आपल्या संपूर्ण टीम सोबत पाचोरा हाॅटेल रविराज परमीट बार चा मद्य साठा तपासणी केला असता त्यात मोठया प्रमाणावर हाॅटेल मधील साठ्यात तफावत आढळून आल्याने “बार” रात्री उशिरा राज्य उत्पादन शुल्क विभागाने सील केले तर पुढील कारवाई साठी हाॅटेल मालकावर विभागीय गुन्हा दाखल केला.
याबाबत राज्य उत्पादन शुल्क चे श्री.माळी यांच्याशी नजरकैदने साधला असता त्यांनी सांगितले की हाॅटेल रविराज बिअर बार चा कारवाईचा अहवाल आज जिल्हाधिकारी यांना आम्ही प्रस्ताव पाठवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.शहरातील इतर वाईन शॉप व बियर बार यांचे देखील लॉक डाऊन काळातील मद्य साठा तपासणी करण्याची मागणी सुज्ञ नागरिक करीत आहेत.
बातमी लावल्या बद्दल हार्दिक अभिनंदन…पण पाठपुरावा झाला तरच फलीत साध्य होईल….