चाळीसगाव, (किशोर शेवरे)– कोरोनाच्या परिस्थीतीत पशुपालक व दुग्धव्यवसाय करणाऱ्या शेतकरी बांधवांना चारा टंचाईस तोंड द्यावे लागत असताना आडगाव जवळ अतिशय आधुनिक तंत्रज्ञानाचा साहाय्याने प्रभात डेअरी कंपनीने गुणवत्तापूर्ण मुरघास गठ्ठा उत्पादन सुरू केले आहे. मक्यापासुन तयार केलेल्या या पशुखाद्य गाठीमुळे दूध उत्पादनात वाढ होणार असून हाताळण्यास सोपे, वाहतुकीस व दैनंदिन वापरास व कमी जागेत साठवता येणाऱ्या असा हा सकस पशुआहाराचा पशु पालक शेतकरी बांधवांसाठी बहुमूल्य असा असून आपल्या परीसरात या उद्योगाचा शुभारंभ होत असल्याचा मला आनंद आहे अशी भावना केंद्रीय पेट्रोलियम व प्राकृतिक गॅस तसेच सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचे स्टँडिंग कमेटी सदस्य खासदार उन्मेश दादा पाटील यांनी व्यक्त केली आहे. मालेगाव रोड वरील आडगाव परिसरात प्रभात डेअरी संचलित अत्याधुनिक बेल सायलेज तथा गठ्ठा मुरघास प्रकल्पाचे उदघाटन नुकतेच खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मेहुणबारे पोलीस स्टेशनचे ए,पी,आय सचिन बेंद्रे, नगरसेवक नितीन पाटील ,सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र काका जैन,आडगावचे सरपंच रावसाहेब पाटील , प्रभात संस्थापक अध्यक्ष सारंगधर पाटील निर्मल,मूरघास तज्ञ सुनील पवार , व्यवस्थापक अशोक पवार, प्रसाद फीडचे व्यवस्थापक ब्रम्हाया, राधा कृष्णन, प्रसाद सिडस हैदराबाद प्रभात डेअरी सिलेज प्रकल्पचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
मका उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधान
मका उत्पादक शेतकरी बांधवामध्ये या उद्योगाच्या शुभारंभाचा आनंद असून ज्या शेतकऱ्यांची मका पाण्याअभावी संकटात आहेत अशा शेतकरी बांधवांसाठी दिलासा मिळाला आहे चांगला भाव देऊन कंपनी हे उभे मका पीक खरेदी करीत आहे. तसेच मका उत्पादकांना योग्य भाव देऊन खरेदी केलेली मका अत्याधुनिक यंत्र सामुग्री द्वारे लगेच प्रक्रिया करून मुरघास गठ्ठे तयार केले जात असल्याने पशु पालकांसह मका उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जाते आहे.