वरणगावं(प्रतिनिधी):- वरणगावं महाविद्यालय आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यामानाने वरणगावं महाविद्यालयांचे प्राचार्य आणि राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख कार्यक्रम अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंसेवकानीं कार्य केले.” NOT ME BUT YOU” ही संकल्पना लक्षात घेऊन सध्याच्या लॉकडॉऊन मध्ये जे गरीब होतकरू, मजूर वरणगावं शहरात अडकलेले आहे त्यांना सकाळचा नाश्ता (चहा पोहे) वाटप करण्यात आला.तसेच शहरातील गरीब वस्तीमध्ये जाऊन घरोघरी सकाळचा (चहा पोहे) नाश्ता तसेंच जीवनाश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले.
सध्याच्या कोरोना सारख्या महाभयंकर आजारात आपले पोलीस बांधव अत्यंत खंबीर पणे आपलं कर्तव्य बजावत आहे.त्यामूळे त्यांना सुद्धा धन्यवाद देणे आपलं कर्तव्य मानून त्यानीं वरणगावं पोलिस स्टेशन मध्ये जाऊन सर्व पोलीस बांधवांना सकाळचा( चहा पोहे)नाश्ता वितरित केला आणि त्यांचे मनःपूर्वक आभार मानलें. सदर कार्यक्रम पार पाडण्यात भूषण सुरवाडे, विनायक शिवरामे, आकाश टिंटोरे ,पवन पाटील,रोशन बावस्कर, विजय राजपूत,केदार माळी, महेश सपकाळे, रुपेश सोनार,आकाश खडसे, शिवा धनगर,निवृत्ती ठोसर,अजय सुरवाडे इत्यादी स्वयंसेवकानीं अथक परिश्रम घेतले आणि कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला…