जामनेर, (प्रतिनिधी)- येथील एमआयडीसी भागात भंगारच्या गोडाऊनला काल रात्री शॉर्ट सर्किटमुळे भीषण लागल्याची घटना घडली सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही.
https://youtu.be/QiJ0IIgjOLI
याबाबत सविस्तर असे की, जामनेर शहरातील भुसावळ रस्त्यावरील एमआयडीसी भागामधील प्लॉट नबर 65 ते 68 महाराष्ट्र स्क्रॅप व रोशनी प्लास्टिक या भंगारच्या गोडाऊन ला काल रात्री 8:35ते 9 च्या सुमारास विजेच्या शॉर्ट सर्किट मुळे स्क्रॅप च्या गोडाऊन मधील साठवलेल्या टायरांवर शॉर्ट सर्किट मुळे विजेच्या तारां वरून आगीचे गोळे पडून टायरानी पेट घेतला ही घटना पाहून ग्रामस्थांनी जामनेर नगरपरिषद ला कळवले व तात्काळ अग्निशामन दलाची गाडी व पथक आल्याने आग विझवण्यास यश मिळाले. गोडाऊन मालक असीम अब्दुल गफार यांचे असल्याचे समजते.