खडके बु वार्ताहर ता. जळगाव (प्रतिनिधी) – येथील द्वारकाबाई थेपडे इंग्लिश मेडियम स्कुल व स्वा सै, पं ध थेपडे मा वि म्हसावद येथील शाळेत विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यास दिला जात आहे कोरोना च्या पार्श्वभूमीवर शाळा बंदचे आदेश देण्यात आले आहे या कालावधीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शाळेतील प्रत्येक वर्ग शिक्षकानी वर्गातील मुलामुलींचे व्हॉट्स अप ग्रुप तयार करूननियमित अभ्यास दिला जात आहे.
यात सर्व प्रथम कोरोना विषाणू विषयी माहिती देऊन त्या संदर्भात प्रत्येकानी काळजी कशी घ्यावी ही माहिती पहिले दिली जातेतसेच प्रत्येक विषय शिक्षक पाठ्य पुस्तकातील घटक उपघाटकावर ऑन लाईन व्हिडीओ माहित देत आहेतसेच प्रत्येक वर्गाचे वर्ग शिक्षकविद्यार्थ्यांना वयक्तिक फोन करून तब्बेतीची विचार पूस करीत आहे सदर हा उपक्रम23 मार्च पासून सुरू करण्यात आला आहे,या उपक्रमासाठी संस्थेचे चेअरमन श्री डॉक्टर के पी थेपडे,व थेपडे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री पी डी पाटील ,डी टी एड कॉलेज चे श्री गोसावी सरइंग्लिश मेडियम सौ संगीता पाटील,शाळेचे उपमुख्याध्यापक श्री डी, एस,खोडपे सर तसेच पर्यवेक्षक श्री पी,के,मुथा सर,शिक्षक प्रतिनिधी श्री भंगाळे सर व ज्युनियर कॉलेज श्री योगराज चिंचोरे सर यांचे मार्गदर्शन लाभले.