जळगाव, (संजय तांबे)- कोरोना संसर्गजन्य रोगामुळे आपत्कालीन परिथितीत जळगाव शहरात भागनिहाय सर्वेक्षण करून जेवण अथवा इतर अत्यावश्यक सेवा पुरविण्याबाबत व सदर माहिती जिल्हाधिकारी कार्यालयात कळविण्याबाबत महसूल विभागाच्या मंडळ अधिकारी, तलाठी,अव्वल कारकून, लिपिक अधिकारी कर्मचाऱ्यांना आदेश निघाले आहेत.काही अधिकारी कर्मचारी आपले कर्तव्य प्रामाणिक पणे निभावतांना दिसत आहे.तर काहींना भाग निहाय सर्वेक्षणाचा असला काही आदेश जिल्हाधिकारी कार्यालयातून निघाला आहे हे सुद्धा माहित नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
कोरोनामुळे देशभरात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्याने शासनस्तरावर जनतेच्या हिताच्या दृष्टीने अनेक उपाय योजना आखल्या जात आहे.त्यानुसारच शहरातील काही भागात भागनिहाय सर्वेक्षण करून जेवण व इतर अत्यावश्यक सेवा देणे किंवा अशा सेवा देण्यासाठी ज्या संस्था काम करत आहे अशा संस्थांची माहिती या कर्मचाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला कळवावे असे आदेश दिनांक 25 मार्च रोजी नोडल अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी प्रसाद मते यांनी काढले आहे.काही कर्मचारी अधिकाऱ्यांनी तर पार जीवाचे रान करीत प्रामाणिक पणे आपली जबाबदारी पार पाडत कर्त्यव्य सेवा बजावली आहे.मात्र हरिविठठ्ल नगर,तांबापुर, समतानगर सह काही भागातील जबाबदारी निश्चित केली असतांना देखील आपली सेवा बजावल्याचे दिसत नाही.याबाबत काही अधिकारी कर्मचाऱ्यांशी दूरध्वनीवर संपर्क केला असता असले काही आदेश आहेत का असा प्रश्न उपस्थित केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.तरी याबाबत जिल्हा प्रशासनाने तात्काळ संबंधित जबादार अधिकारी कर्मचाऱ्यांचा कामाचा आढावा घेऊन कार्यवाही करावी व जनतेला जेवण व इतर अत्यावश्यक सेवा पुरविण्यात याव्या अशी अपेक्षा नागरिकांकडून होत आहे.तरी या आदेशाचे तात्काळ अंमलबाजवणी व्हावी असा सुर निघत आहे.