- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखता यावा म्हणून मनपा नगरसेविका यांच्या मार्गदर्शनाखाली वधू व वर पालकांनी घेतला मोठा निर्णय
जळगांव (विशेष प्रतिनिधी) – महानगर पालिकेच्या वार्ड क्रं 3 चे नगरसेविका सौ. मीनाताई धूडकू सपकाळे यांच्या भाचीचा विवाह दोन दिवसावर असताना नगरसेविका यांनी वर व वधू यांच्या पालकांसोबत समन्वयाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखता यावा म्हणून व प्रशासनाला सहकार्याच्या भूमिकेतून विवाह पुढे ढकलण्यात आले.
सविस्तर वृत्त असे की नगरसेविका मीनाताई धुडकु सपकाळे यांची भाची श्री अरुण खंडू सोनवणे राहणार रल लाडली हमु रामेश्वर कॉलनी जळगांव द्वितीय कन्या अर्चना हीचा विवाह कासमपुरा येथील शेनफडू शंकर खरे यांचे चि विजय दिनांक 29 मार्च 2020 रोजी आयोजित करण्यात आला होता. संपूर्ण लग्नाची तयारी देखील पूर्ण झाली होती.परंतु कोरोणाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नगरसेविका यांनी दोघा कुटुंबांना कोरोना संदर्भात मार्गदर्शन केले,व त्यांनी नियोजित लग्न सभारंभात सर्व नातेवाईक प्रतिष्ठित नागरिक मित्रमंडळी यांना त्यांच्या परिवाराला कोणत्याही प्रकारची हानी होऊ नये व सरकारच्या संचारबंदी चे पालन व्हावे म्हणून लग्न पुढे घेण्याचा मोठा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.या निर्णयाने सर्वत्र कौतुक होत आहे.