- के.सी.इ. सोसायटी चे इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च , जळगाव मध्ये रिटेल क्षेत्रातील आव्हाने (challenges in retail sector) या विषयावर उद्योजक नितिन रेदासनी यांचे मार्गदर्शन

जळगाव दि.14 – के.सी.इ. सोसायटी चे इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च , जळगाव मध्ये व्यवस्थापनच्या विद्यार्थ्यांनसाठी विविध उद्योजक विषयक उपक्रम राबविण्यात येत असतात त्याच निमित्त इन्स्टिट्यूट मध्ये रिटेल क्षेत्रातील आव्हाहने (challenges in retail sector) मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी आय.एम.आर. चे संचालक प्रा. डॉ. शिल्पा बेंडाळे यांनी विद्यार्थ्यंना आव्हान करत ” व्यवस्थापन क्षेत्रात असताना खूप संधी उपलब्ध असतात त्या ओळखायला शिकले कि सर्व आव्हानांना आपण सामोरे जाऊ शकतो आणि प्रगती साठी विशिष्ठ क्षेत्रातील संधी ओळखणे, तसे पाऊल उचलणे हे आपण स्वतः अभ्यासून व अनुभवी आणि तज्ञ व्यक्तीच्या मार्गदर्शनात राहून घेतले पाहिजे “असे सांगितले.
कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख वक्ता म्हणून रोटेरियन नितीन रेदासनी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर व्याख्यानात “ त्यांचा पारंपरिक आठवडे बाजार ते मॉडर्न युगात सर्व वस्तू एका जागी असलेल्या मॉलच्या संकल्पनेपर्यंतचा प्रवास कसा झाला” ते सांगितलं. रिटेल उद्योग करताना त्यांनी बऱ्याच गोष्टी प्रकाश झोतात आणून दिल्या जसे ई – कॉमर्स , ऑनलाईन व्यापार , मोबाईल अँप्लिकेशन या फॅसिलिटी असताना सुद्धा रिटेल व्यापाराने आपला व्यापार कसा सुरु ठेवावा व कसा जास्तीत जास्ती फायदा करावा तसेच आजकाल च्या स्पर्धांमुळे एकच वस्तू विविध कंपनी आपल्यापर्यंत पोहचवत असतात, त्यावेळी ग्राहकांच्या आवडी निवडी लक्षात घेता कश्याप्रकारे आपण जास्तीत जास्ती वस्तू त्यांना उपलब्ध करून देऊ शकतो हि एक कौशल्यच आहे . त्यासाठी KYC नो युअर कस्टमर हि संकल्पना विदयार्थ्यांना समजावली ”. बदलत्या काळानुसार व्यापार करत असताना सण-उत्सव , इंटरनॅशनल मार्केट , लाइफस्टाईल , टेकनॉलॉजी , विविध ऑनलाईन सेवा , स्वच्छता , सर्व सोयीनं युक्त वस्तू अशा अनेक गोष्टी परिणाम करत असतात. त्या गरजा पूर्ण करत आपला बिझिनेसचे स्पर्धकांमध्ये वेगळेपण जपणं हे सर्वाधिक महत्वाचे आणि गरजचे आहे. कारण बदल हीच काळाची गरज आहे. ग्राहकांच्या आवडी निवडी लक्षात घेताना आपल्या बिझिनेस मधील कर्मचार्यांचे ओरिएन्टेशन व समाधान देखील महत्वाची बाब आहे . कारण ग्राहक वस्तू निवड करताना काही मदत लागल्यास दुकानात उपस्थित सेल्समॅनशी संवाद करतो तर त्यावेळी ग्राहक समाधानी असणं देखील महत्वाचे त्या करिता ओरिएन्टेशन हे महत्वाची बाब ठरेल.अश्या अनेक व्यवस्थापन क्षेत्रातील संकल्पना सांगत व व्यावहारिक उदहारण देत रोटेरियन श्री. नितीन रेदासनी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.शुभधा कुलकर्णी यांनी केले तर आभार प्रदर्शन धनश्री चौधरी यांनी केले . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापक व इतर कर्मचारी यांचा सहभाग लाभला.