- अनिल सावंत महानगर अध्यक्ष तर दिपक म्हस्के सचिवपदी बिनविरोध

औरंगाबाद, (प्रतिनिधी) – येथील दै. ‘मराठवाडा साथी’चे कार्यकारी संपादक डॉ. प्रभू व्यंकटराव गोरे यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या औरंगाबाद जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार दि १२ मार्च रोजी औरंगाबाद शहर व जिल्ह्यातील पत्रकारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी संघाचे मार्गदर्शक संतोष मानुरकर, मराठवाडा विभागाचे प्रभारी संघटक वैभव स्वामी, औरंगाबाद ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष प्रशांत क्षीरसागर यांची विशेष उपस्थिती होती.
या बैठकीत जिल्हाउपाध्यक्ष म्हणून मनोज सांगळे, अशोक खाडे, दै. ‘मराठवाडा केसरी’चे संपादक छबुराव ताके, जिल्हा संघटक विलास शिंगी यांची तर सायं. दैनिक ‘देवगिरी वृत्त’चे संपादक अनिल सावंत यांची महानगर अध्यक्ष, हनुमंत कोल्हे यांची महानगर उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. दिपक म्हस्के यांची सचिवपदी तर मुकेश मुंदडा यांची कोषाध्यक्षपदी तसेच प्रसिध्दी प्रमुख म्हणून सचिन अंभोरे, राहुल थोर यांची निवड करण्यात आली.
उर्वरित कार्यकारिणी अशी आहे, सहसचिव सी.एम. दुर्बे, आनंद अंभोरे, सुनिल वाघ, रमेश जाबा, सहकोषाध्यक्ष सदाशिव गवारे, शेख इसाक, सुनिल गुढेकर, संजय हिंगोलीकर, सदस्य – बाबासाहेब मुजमुले, सागर भोसले, तुकाराम राऊत, माजेद खान, प्रविण कुलकर्णी, महिला प्रतिनिधी – राधिका टिळेकर, आरती खोजे तर मार्गदर्शक म्हणून एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. डॉ. सुधीर गव्हाणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील जनसंवाद व वृत्तपत्र विद्या विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. दिनकर माने, दै. ‘मराठवाडा साथी’चे संपादक जगदीश बियाणी, ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे, रमाकांत कुलकर्णी यांची एकमताने निवड करण्यात आली. वरील कार्यकारिणी पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी कार्य करेल असा विश्वास नूतन जिल्हाध्यक्ष डॉ प्रभू गोरे यांनी व्यक्त केला. समाजाच्या जडण घडणीत पत्रकारांचा सिंहाचा वाटा असतो. पण तो स्वत: कायम दुर्लक्षीत असतो, हे कटू असले तरी सत्य आहे आणि आपण सारे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून पत्रकारांसाठी तन, मन व धनाने या पुढे कार्य करु, असे प्रतिपादन यावेळी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त करतांना वसंत मुंडे यांनी व्यक्त केले.
बैठकीच्या सुरुवातीला ज्येष्ठ पत्रकार, संपादक अनंत दिक्षीत यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. यावेळी वसंत मुंडे, वैभव स्वामी यांनी दिक्षीत यांच्या पत्रकारितेवर प्रकाश टाकत त्यांच्या समाजोपयोगी कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.