जळगाव – शिवतिर्थ मैदानावर २३ ते २९ फेब्रुवारी दरम्यान भगवान श्री रामदेवजी बाबा कथामृताचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त कथेसह विविध धार्मिक कार्यक्रम होणार असल्याची माहिती भगवान श्री.रामदेवजी बाबा सेवा समितीच्यावतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी सुभाष जाधव, प्रा.एन.व्ही.भारंबे, अशोक राठी, राजू बांगर, डी.एन तिवारी, माधव राठोड, अमरसिंग पवार यांची उपस्थिती होती. २३ रोजी दुपारी १२ वाजता गोलाणी मार्केटजवळील हनुमान मंदिरापासुन भव्य शोभायात्रेस प्रारंभ होवून शिवतिर्थ मैदाणापर्यंत ही शोभायात्रा काढण्यात येणार आहे. यात लेझिम पथम, बॅन्ड पथक, कळसधारी महिलांचा समावेश असणार आहे.
प.पू संत लक्ष्मण चैतन्य बापूजी यांचे शिष्य संत गोपाल चैतन्य महाराज यांच्या वाणीतून कथामृत होणार आहे. दुपारी १ ते ४ यावेळेत ही कथा सुरू राहणार आहे. या कथेचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. २४ ते २८ दरम्यान दररोज सायंकाळी ७ ते १० यावळेत किर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. दि.२४ रोजी हभप मधुकर महाराज यांचे किर्तन होणार आहे. दि.२५ रोजी हभप नरेंद्र महाराज, दि.२६ रोजी हभप रामभाऊ उन्हाळे, दि.२७ रोजी ह.भ.प विशाल महाराज, तर २८ रोजी ह.भ.प ज्ञानेश्वर महाराज यांचे किर्तन होणार आहे.