जळगाव- केसीई सोसायटीच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त मूळजी जेठा महाविद्यालयातील मानवी मूल्य प्रशाळा द्वारे “ध्यान आणि मेंदू विज्ञान” या विषयावर शनिवार 22 रोजी महाविद्यालयातील जुना कॉन्फरन्स हॉल येथे सकाळी 10 ते 1 या वेळेत ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
यावेळी मुंबई येथील डॉक्टर यशवंत वेलणकर हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहतील. संपूर्ण आरोग्य प्राप्तीसाठी आणि सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी ध्यान साधनेचे महत्त्व सदोदित सांगितले गेले आहे आणि ज्ञान विज्ञान स्वाध्याय समजून घेण्यासाठी उपस्थितीचे, तसेच या कार्यशाळेत सहभागींना प्रमाणपत्र दिले जाईल, असे आवाहन मानवी मूल्य शाळेतर्फे करण्यात आले आहे