जळगाव – भगिनी मंडळाचे समाजकार्य महाविद्यालय चोपडा येथे दिनांक 8/02/2020 रोजी नेहरू युवा केंद्र जळगाव आणि खान्देश परिसर फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जगताना कायदा आणि कायद्याची उपयुक्तता हा कार्यक्रम सकाळी 11 ते 5 या वेळेत आयोजित करण्यात आला होता.
सदर कार्यक्रम हा नेहरू युवा केंद्र तर्फे थीम बेस अवेयरनेस अँड एज्युकेशनल प्रोग्रॅम या शीर्षकाखाली घेण्यात आला तसेच शहरातील आणि इतर महाविद्यालयातील युवकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घेतला या कार्यक्रमात कार्यक्रमाचे वक्ते अडव्हकेट अविनाशजी पाटील घरघुती हिंसाचार कायदा 2005 चे विशेष तज्ञ असून त्यांनी या कायद्या प्रति सामाजिक जागृती आणि कायद्या जी अंमल बजावणी करताना येणार्या अडचणी या संदर्भात विद्यार्थ्यांना आणि युवकांना मार्गदर्शन केले आहे असून वकिली क्षेत्रात कार्यरत आहेत आणि श्रीमती विद्याताई सोनार ह्या महिला बाल कल्याण क्षेत्रात कार्यरत असून महिला आणि बालसहाय्य कक्ष जळगाव येथे समुपदेशक आहेत दृष्टीने अनेक समित्या आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भूषवले आहेत आणि महिला बाल कल्याण या क्षेत्रात गाढा अभ्यास आहे खान्देश परिसर फौंडेशन ही संस्था महिला आणि तरूण मुला मुलींच्या समस्येवर कार्य करते तसेच कार्यक्रमाच्या यशस्विते साठी समाजकार्य महाविद्यालय चोपडा यांचे प्रा.डॉ.सौधानकर ,प्रा.आशिष गुजराथी,प्रा.शैलेश पाटील खान्देश परिसर फौंडेशन संस्थे चे डॉ. सागर पाटील,श्री विनोद पाटील तसेच संस्थेचे कर्मचारी यांनी मेहनत घेतली.