जळगाव : दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने हरित उर्जेवर चालणा-या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल ऑन ई-व्हेईकल) मोफत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या मुदतीत वाढ करण्यात आली असून दिनांक 10 फेब्रुवारी 2025 पर्यंत दुपारी 12:00 वाजता पर्यत ऑनलाईन नोंदणी करण्यात येणार आहे.
या योजनेच्या अंमलबजावणीची कार्यवाही महाराष्ट्र दिव्यांग वित्त व विकास महामंडळ, मर्या. यांचे स्तरावरुन सुरु आहे.
प्रस्तुत योजनेला मिळत असलेला प्रतिसाद आणि मागणी लक्षात घेऊन गरजू दिव्यांग व्यक्तींना योजनेचा लाभ मिळण्यासाठी अर्जदार नाव नोंदणी (अर्ज करण्यासाठी) पोर्टल https://register.mshfdc.co.in ही लिंक दिनांक 10 फेब्रुवारी 2025 दुपारी 12:00 वाजेपर्यंत उपलब्ध करुन देण्यात आली आहे. योजनेचा लाभ अधिकाधिक दिव्यांग व्यक्तींनी घ्यावा. असे आवाहन प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.