जळगाव: जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव यांच्या वतीने सर्व नागरिकांना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आवाहन केली आहे की , शासनाच्या महसूल व वन विभागाच्या शासन परिपत्रकानुसार वाळू/रेतीचे उत्खनन, साठवणूक आणि विक्रीसंबंधी प्रस्तावित वाळू/रेती धोरण – 2025 चे प्रारुप तयार करण्यात आले आहे.
सदर प्रारुप धोरण हरकती व सूचनांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या www.jalgaon.nic.in या संकेतस्थळावर तसेच उपविभागीय अधिकारी व तहसीलदार कार्यालयांच्या नोटीस बोर्डावर उपलब्ध आहे.
नागरिकांनी आपले अभिप्राय व हरकती लेखी स्वरुपात सादर करण्यासाठी दिनांक 03 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 3.30 वाजता अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे उपस्थित राहावे. त्यानंतर प्राप्त होणाऱ्या हरकती व सूचना विचारात घेतल्या जाणार नाहीत.