चोपडा – पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने ‘वाट दाखवितो क्षितिजाची’ या विषयावर विद्यार्थी, पालक व शिक्षक यांच्यासाठी उदबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. स्वागत व सत्काराने या कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष पंकज बोरोले हे होते. तसेच या कार्यक्रमास सउपाध्यक्ष , अविनाश राणे, संचालक भागवत भारंबे, गोकुळ भोळे, सौ. दिपाली बोरोले मुख्याध्यापक एम व्ही पाटील ,व्ही आर पाटील.प्राचार्य मिलिंद पाटील, डॉ. किशोर पाठक सर आदी उपस्थित होते पालक मार्गदर्शन करतांना झी 24 तास वाहिनी वरील ‘पासवर्ड आनंदाचा’ कार्यक्रम सदरक मा प्रशांत देशमुख(मुंबई) म्हणाले, “विद्यार्थी पालक – शिक्षक,विद्यार्थी – शिक्षक यांच्यातील अंतर कमी व्हावे,त्यामुळे सर्व विकासास चालना मिळते. विद्यार्थ्यांना जे क्षेत्र आवडीचे ते निवडू द्यावे पालकांनी विद्यार्थ्यांना क्षेत्र निवडीसाठी सक्ती करू नये.जीवनाच्या प्रत्येक वळणावर प्रत्येकास प्रश्न विचारला जातो ‘तुम्ही या ठिकाणी कशा साठी आलात ? माणसाला असे कौशल्य यावे ज्यास जगात तोड नसावी.
पालकांनी पारखी बनावं, आपल्या पाल्याच कौशल्य ओळखता आले पाहिजे.पालकत्व सजग असावं.मुलांना मोबाईल पेक्षा वाचनीय पुस्तकं द्या.मुलांच्या प्रगतीसाठी मन स्थिर करण्याचं शिक्षण द्या त्यासाठी ध्यान धारणा करावी. नामस्मरण केल्याने मन स्थिर होण्यास मदत होते.रायगडावर प्रेरणा घेण्यासाठी मुलांना सोबत घेऊन जावे.शिवचरित्र स्वतः वाचून पालकांनी जीवनात संघर्ष करणाऱ्या शिवरायांच्या महान कार्याची उदाहरणे मुलांना द्यावी कार्यक्रमास सुजाण पालकांची उपस्थिती उल्लेखनीय होती