मुंबईत आज भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली असून या बैठकीत गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis ) यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. विधानभवनातील भाजप (bjp) विधिमंडळ पक्ष कार्यालयात भाजप पक्ष निरीक्षक विजय रुपाणी आणि निर्मला सीतारमन यांच्या उपस्थितीत भाजपची कोअर कमिटीची बैठक झाली. यावेळी भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीसांच्या नावावर एकमत झाले असून उद्या ५ डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील दरम्यान भाजपाचे संकटमोचक गिरीष महाजन (girish mahajan) यांनी आज देवेंद्र फडणवीस यांचं पुष्पगुछ देऊन अभिनंदन केलं आहे. (CM of maharashtra)
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आता १२ दिवस झाले असून देखील राज्यात सरकार स्थापन झाले नसल्याने मुख्यमंत्री कोण होणार याची सर्वत्र उत्सुकता होती अखेर महायुतीने देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्का मोर्तब केला आहे. देवेंद्र फडणवीस उद्या तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. Letest news marathi