जळगाव,(प्रतिनिधी)- बागेश्वर धाम येथील बाबाजी धीरेंद्र शास्त्री यांच्या भव्य दिव्य कथेचे (bageshwar dham) आयोजन जळगाव शहरा नजीक असलेल्या पाळधी (bageshwar dham katha schedule 2024) जवळील झुरखेडा गावठाणात 25 डिसेंबर ते 30 डिसेंबरच्या दरम्यान आयोजन करण्यात आले असून एक दिवसाचा दरबार देखील होणार आहे.(bageshwar dham location)
25 तारखेपासून रोज दुपारी तीन ते सहा या वेळेत धीरेंद्र शास्त्री कथेचे निरूपण करणार आहेत.आयोजकांनी नुकतीच या जागेची पाहणी केली असून कार्यक्रमांची जोरदार तयारी सुरु आहे. जळगावात पहिल्यांदाच बागेश्वर धाम येथील बाबाजी धीरेंद्र शास्त्री (bageshwar dham sarkar)येत असल्याने मोठी गर्दी जमण्याची शक्यता असल्याने त्या दृष्टीने आयोजन सुरु आहे. ( bageshwar dham news)
बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या नेतृत्वात निघालेल्या सनातन हिंदू एकता पदयात्रेचा नुकताच समारोप झाला आहे.धीरेंद्र शास्त्री यांनी २१ नोव्हेंबरपासून हिंदू एकतेसाठी सनातन हिंदू एकता पदयात्रा सुरू केली होती. बागेश्वर धाम ते ओरछा हे १६० किमीचे अंतर ९ दिवसांत कापण्यात आले. हिंदूंना एकत्र आणण्यासाठी आणि सनातन धर्माचा प्रचार करण्यासाठी ही पदयात्रा काढत असल्याचे धीरेंद्र शास्त्रींनी सांगितले.(bageshwar dham katha live)
नुकतेच राजस्थानच्या भीलवाडा शहरात आयोजित पाच दिवसीय हनुमंत कथेच्या तिसऱ्या दिवशी एक असा चमत्कार पाहायला मिळाला, ज्याने भाविकांना अभिभूत केले. बागेश्वर धाम सरकारचे प्रसिद्ध पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी दिव्य दरबार भरवला, जिथे लाखो लोकांमधून एक-एक भाविकाला नावाने हाक मारण्यात आली आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण सांगितले.बागेश्वर धाम सरकारचे प्रसिद्ध पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी दिव्य दरबारची सर्वत्र उत्सुकता आणि चर्चा पाहायला मिळते.(bageshwar dham darbar)