मुंबई – भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांनी विधीमंडळ गट नेतेपदी देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis)यांची निवड केली. त्यामुळे आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस असणार आहे. भाजपने धक्कातंत्र वापरताना इतर राज्यात नेतृत्व बदल केले.मात्र, महाराष्ट्रात भाजपने देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा संधी दिली आहे. फडणवीस यांच्या ऐवजी इतर काही नावांची चर्चा होती. मात्र, देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली.
भाजपाने देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर राज्यात ठिकठिकाणी पेढे वाटून व फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात येत आहे.महाराष्ट्रात महायुतीचे सरकार गुरुवारी स्थापन होणार आहे. त्याआधी आज भारतीय जनता पक्षाचा गटनेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली आहे. यासाठी भाजपचे सर्व आमदार विधान भवानात दाखल झाले होते . सेंट्रल हॉलमध्ये भाजप गटनेता निवडीची बैठक झाली.