जामनेर,(प्रतिनिधी)- विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचे अधिकृत उमेदवार मंत्री गिरीष महाजन यांच्या प्रचाराचा प्रारंभ जामनेर येथील सिद्धगड भवानी माता मंदिर येथे नतमस्तक होऊन मंगळवारी (ता.०५) करण्यात आला.यावेळी मोठया संख्येने महायुतीचे पदाधिकारी, कारकर्ते उपस्थित होते.
विजय निश्चित – मंत्री गिरीष महाजन
प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी बोलतांना मंत्री गिरीष महाजन म्हणाले की,आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने व साथीने मी भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपाइं महायुतीचा उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहे.
आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान असलेल्या सिद्धगड भवानी माता मंदिर येथे नतमस्तक होत आज प्रचाराचा नारळ फोडला. आई भवानी मातेच्या आशीर्वादाने आपल्याला नक्कीच यश मिळेल हा विश्वास आहे.
गिरीश महाजन यांचा घरोघरी जाऊन प्रचार
ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या शहरातील प्रचाराची धुरा नगरसेवकांनी स्वीकारली असून, आपापल्या प्रभागात कार्यकत्यांसह प्रचाराला सुरुवात केली आहे.
महाजन यांनी मतदारसंघातील जि. प. गटनिहाय घेतलेल्या मेळाव्यानंतर प्रचाराचा पहिला टप्पा पूर्ण झाला होता. आता उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रत्यक्ष मतदारांना घरोघरी भेट देऊन कार्यकर्ते महायुती शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती मतदारांपर्यंत पोहचवित आहेत.प्रचाराचा शुभारंभ रविवारी, गिरीश महाजन व माजी नगराध्यक्ष साधना महाजन यांनी बजरंगपूर भागातील दुर्गा देवी मंदिरात नारळ वाढवून केला. बजरंगपुरा येथील प्रचार रॅलीत नगरसेवक अतिश झाल्टे, जितेंद्र पाटील, दत्तात्रय सोनावणे, तेजस पाटील, जितेश पाटील, रवी बंडे, दीपक तायडे, अॅड. सितेश साठे, सनी डांगी, चंद्रकांत बाविस्कर, रवींद्र झाल्टे, राजेंद्र भोईटे, अशोक नेरकर, राजेंद्र देशपांडे, राजू महाजन, सदाशिव माळी, सुहास पाटील, नीलेश चव्हाण, राजेश नाईक आदी कार्यकर्ते उपस्थित होते.