दिल्ली – लोकसभेत भाजपाला महाराष्ट्रात अपेक्षित जागा न मिळाल्याने राज्याच्या राजकारणात भाजपा भाकरी फिरवणार अशी चर्चा सुरु होती दरम्यान लोकसभेच्या पराभवानंतर देवेंद्र फडणवीस यांनी देखील सरकारमधून मुक्त करावे अशी विनंती भाजपाच्या हायकमांड कडे केली होती. एकंदरीत फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद सोडण्याची तयारी दर्शवली होती मात्र फडणवीसांची ही विनंती केंद्रीय नेतृत्वाने फेटाळली आहे त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वात आगामी विधानसभा निवडणुका होतील असे संकेत भाजपा पक्षक्षेष्ठीनीं दिली आहे.
मंगळवारी रात्री दिल्लीत भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) विनंतीवर निर्णय घेण्यात आला आहे. पत्रकारांनी यावेळी महाराष्ट्रातील नेतृत्व बदलावर काही चर्चा झाली का? असा प्रश्न विचारला होता.या प्रश्नाला देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत असलेले पियुष गोयल यांनी महाराष्ट्रातील नेतृत्वात कोणतेही बदल होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना सरकारमधून मुक्त करण्याची विनंती भाजपच्या हायकमांडने फेटाळली आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री पदावर कायम राहणार असल्याचं स्पष्ट केलं.
संकटमोचक गिरीश महाजन गृहमंत्री होणार? मंत्रिमंडळ विस्तार.. आमदाराचे संकेत!
विधानसभा जिंकण्यासाठी रोडमॅप तयार – फडणवीस
दिल्लीत पत्रकारांशी बोलतांना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या अनुषंगाने आजच्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. कुठे मतं कमी मिळाली? कुठे मतं जास्त मिळाली? त्यामागची कारणे काय होती? कोणता मुद्दा त्या ठिकाणी निर्णायक ठरला? या सगळ्या मुद्यावर चर्चा झाली, असे फडणवीस यांनी सांगितले. महायुतीच्या सगळ्या घटकांना सोबत घेऊन विधानसभा कशी जिंकता येईल? यासंदर्भातला एक ‘रोडमॅप’ तयार करण्यात आल्याचे देखील फडणवीस यांनी सांगितलं.