पाचोरा – शहरात झेरवाल ग्रुप तर्फे चमूकल्यांसाठी झेरवाल प्रीस्कुल सेंटर सुरू झाले असून ह्या शाळेचे संपूर्ण कामकाज क्रिडो चाईल्डहूड सोल्युशन ही कंपनी बघणार आहे. शिक्षण क्षेत्रात योगदान देणाऱ्या झेरवाल ग्रुप ची ही एक नवीन संकल्पना पाचोरा शहरासाठी उपयुक्त ठरणार आहे. या शाळेमध्ये 4 वर्ग असून प्रत्येक वयोगटातील मुलांना त्या प्रमाणे शिकविण्यात येणार आहे. वय 2वर्ष पासून 5 वर्षा पर्यंत चे लहान मूल मुली येथे शिक्षण घेऊ शकतात. आधुनिक काळासोबत शिक्षणात बदल होत आहे त्या बदलत्या शिक्षण व्यवस्थेत प्रत्येक पालकाला वाटते आपला पाल्य मागे राहता कामा नाही. त्यामुळे पाचोरा सारख्या छोट्या शहरात इंटरनॅशनल लेवल ची शाळा ही पालकांसाठी एक चांगला पर्याय ठरू शकते. या शाळेमद्धे खूप साऱ्या आधुनिक छोट्या वस्तूंचा समावेश आहेत. प्रत्येक वस्तू चे एक विशिष्ट वैशिष्ठ आहे. वस्तूंसोबत खेळतांना मुलांचा बोद्धीक विकास लवकर व झपाट्याने होतो. लहान मुलांचा मेंदू 7 वर्षांपर्यंत झपाट्याने वाढतो त्यामुळे ह्या वयापर्यंत विशेष लक्ष दिले तर मुलांचा बौद्धिक विकास वाढवता येतो. A फॉर अप्पल हे प्रत्येक शाळेत असत मात्र त्यासोबत वेगळं पाहिजे असेल तर झेरवाल प्री स्कुल सेंटर हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. या शाळेमध्ये घरातील जीवन उपयोगी पोळपाट लाटणे, शेगडी, पाठ, प्याला, ताटली, चमचा, कढई, कुलूप इ जवळ जवळ सर्व वस्तुंचा समावेश आहे. या मुळे मुलांना ह्या वस्तू लवकर कळतात व बौद्धिक विकास वाढतो. पाचोरा शहरातील पालकांनी ह्या शाळेमध्ये एकदा तरी निश्चित भेट द्यावी व शाळा पडताळल्या शिवाय कुठेही प्रवेश घेऊ नये असे आव्हाहन झेरवाल ग्रुप तर्फे करण्यात आले आहे. ह्या शाळेचे उदघाटन मा जि प सदस्य शांताराम सोनजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले या वेळी आ किशोर पाटील, नगराध्यक्ष संजय गोहिल, उपनगराध्यक्ष शरद पाटे यांच्या सह न पा चे नगरसेवक, पत्रकार मित्र, इष्टमित्र परिवार, नातेवाईक व पाचोरा शहरातील प्रतिष्ठित उपस्थित होते