जळगाव,(प्रतिनिधी)- जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या प्रचारार्थ भाजपा उमेदवार स्मिता वाघ यांनी आज जळगावात प्रचार दौरा करत नागरिकांना मोदींच्या विकासाबाबत माहिती देत संवाद साधला, शहरातील रिंग रोड येथील श्री हनुमान मंदिर येथे मारुतीरायाचे दर्शन व आशीर्वाद घेऊन दौऱ्याला सुरुवात झाली व त्यासोबतच पुढे जेडीसीसी कॉलनी,रिंग रोड,यशवंत कॉलनी,गणेश कॉलनी,नंदनवन कॉलनी व इतर भागांचा देखील समावेश होता.
यादरम्यान आपल्या शहराचे आमदार राजुमामा भोळे यांच्या “चंद्रमौळी” या निवासस्थानी भेट दिली. तेथे औक्षण देखील करण्यात आले व जेष्ठ श्रेष्ठांचे आशीर्वाद लाभले. उत्साहाच्या वातावरणात या प्रचाराला नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला.यावेळी देखील आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकासाच्या संकल्पनेसोबतच उभे आहोत असा विश्वास नागरिकांनी दर्शवला.
यावेळी आपल्या शहराचे माननीय आमदार राजुमामा भोळे,माजी महापौर सीमा ताई भोळे,महानगर अध्यक्ष उज्वला ताई बेंडाळे,नगरसेविका सुचिता हाडा,नगरसेविका दिपमाला काळे,अनिल अडकमोल,अध्यक्ष,सरिता ताई माळी,मनोज भाऊ काळे,माजी उपमहापौर अश्विन सोनवणे,अरविंद भाऊ देशमुख,नगरसेवक दिलीप पोकळे,विशाल त्रिपाठी,नगरसेविका गायत्री राणे,आशिष सपकाळे आदी कायकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.