पाचोरा,(किशोर रायसाकडा)- येथील पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशन हद्दीतील वरखेडी येथील गावाला लागुन शेतात कत्तलखान्यातून बारा गायींची सुटका गो रक्षकांनी केले असून गो रक्षकांच्या सतर्कतेने १२ गायी वाचविण्यात यश आले.
प्राप्त माहिती अशी की, परिसरातील गो रक्षकांना या अवैध कत्तल खान्याची माहिती मिळाली असता या ठिकाणी असलेल्या गाई,बैल,वासरांचे काय करताय याबाबत कत्तल खान्यातील कुराशी यास विचारणा केली असता सदर इसमाची बोलतांना बोबडी वळली, त्यास योग्य व समाधानकारक माहिती देता आली नाही तसेच त्यांच्या घराच्या वर काही गाई, वासरांची अवशेष हाडे मिळालीत तर हे ही जनावरे कापण्यासाठी आले असावे असा प्राथमिक अंदाज गोरक्षकांनी लावला तर ते कापल्यानंतर तेथुन काही मास बाहेर काही गावांमध्ये पाठवले जाते असे वरखेडी परिसरातील नागरिकांनी सांगितले तर इतक्या मोठ्या प्रमाणात कुठल्याही परवानगी नसताना कत्तलखाना बंद होत नाही ही खुप दुर्दैवी बाब लक्षात येताच गोरक्षकविश्व हिंदू परिषद बजरंग दल वरखेडी सुरेश पाटील,हेमंत ग्रो. सागर पाटील. ज्ञानेश्वर पाटील. बबलू पाटील. प्रकाश वनारसे,धनंजय तिवारी, सोपान पाटील,प्रतीक सोनार, मनोज बारी, दीपक तिवारी, मिलिंद चौधरी,तुषार जगताप या गोरक्षकांनी पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशन येथे एकुण १२ गाई,वासरे,बैल यांना गाडीत घेऊन येत कायदेशीर कारवाई केली. पुढील कारवाई पोलीस कर्मचारी करीत आहे, संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात कैवली शिवार येथील माता पिता गोशाळा सेवाभावी संस्था येथे १२ गाई,वासरे,बैल यांची व्यवस्था केली.
तर माता पिता गोशाळा सेवाभावी संस्था अध्यक्ष मनोज गायकवाड यांनी पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशन येथील साहय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश काळे साहेब, पी एस आय अमोल पवार, पो.काॅ विजय माळी, पो.काॅ.रंजित पाटील ,पो.काॅ.अरुण राजपुत,पो.काॅ.पंकज सोनवने व गोरक्षकांचे माता पिता गोशाळा सेवाभावी संस्था संचालक मंडळाच्या वतीने आभार मानले ह्या मोठ्या कारवाईचे परिसरात कौतुक होत आहे.