जळगाव,(प्रतिनिधी)- माजी मंत्री राष्ट्रवादीचे विधानपरिषद आमदार एकनाथराव खडसे यांनी भारतीय जनता पक्षात स्वगृही जाण्याचा निर्णय घेतल्या नंतर शरद पवार पहिल्यांदाच खडसे यांच्या भाजपात जाण्यावर बोलले असून खडसे यांच्याकडून विधान परिषदेची आमदारकी परत घेणार नाही असे स्पष्ट देखील केलं आहे.
खडसेंना त्यांन कुटुंब चालवणं अवघड केल;शरद पवार
एकनाथ खडसे यांना मीच तुम्हाला जिथे सोयीस्कर वाटते, तिथे जा, असे सांगितले, त्यांच्या इतक्या चौकशा त्यांनी सुरू केल्या, व्यक्तिगत संपत्ती जप्त केली, की त्यांना कुटुंब चालवणंसुद्धा अवघड करून टाकलं, असल्याचं शरद पवार यांनी पुण्यातील पत्रकार परिषदमध्ये पत्रकारांशी बोलतांना सांगितलं. दरम्यान खडसे यांच्याकडून विधान परिषदेची आमदारकी परत घेणार का असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्या नंतर शरद पवार म्हणाले नाही, कारण एकदा दिलेले मी परत घेत नाही, असेही पवार म्हणाले.
दरम्यान माजी मंत्री सतीशअण्णा पाटील यांनी खडसे यांना राष्ट्रवादी पक्षात घेतलं ती चूक झाली असं शरद पवारांना वाटत असल्याचं सांगत खडसेंवर टीकास्र सोडलं होतं दरम्यान स्वतः शरद पवार यांनी मात्र एकनाथ खडसे यांच्यावर नाराजी अथवा टीका केलेली नाही उलट विधान परिषदेची आमदारकी परत घेणार नसल्याचं जाहीर केलं आहे.
खडसेंचा भाजपा प्रवेश लांबनिवर?
दिल्लीत जाऊन केंद्रीय नेतृत्वाच्याहस्ते भजपात लवकरच प्रवेश करेल असे एकनाथ खडसेनीं सांगितलं होतं खरं मात्र अद्यापही त्यांचा भाजपा प्रवेश न झाल्याने राज्यातील भाजपा नेत्यांची त्यांच्याविषयी असलेली नाराजीमुळे खडसेंचा भाजपा प्रवेश लांबनिवर पडला अशी चर्चा होतं आहे.