पुणे,(प्रतिनिधी)- जन्मदात्या बापानेच अल्पवयीन मुलीशी गैरवर्तणूक करून तिचे लैंगिक शोषण (Sexual Exploitation) केल्या प्रकरणी पुण्यातील कोंढवा पोलिसांनी नराधम बापा विरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत (POCSO Act) गुन्हा दाखल केला असून घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
सातारा जिल्ह्यातील बुध येथे मागील एक वर्षापासून ते 26 मार्च 2024 या कालावधीत जन्मदात्या बापानेच पोटच्या मुलीवर लैंगिक शोषण केले या प्रकरणी पीडित मुलीच्या 35 वर्षीय आईने सोमवारी (दि.1 एप्रिल) कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यावरुन नराधम बापावर आयपीसी 354(अ) सह पोक्सो अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी पती – पत्नी असून, त्यांना 13 वर्षांची मुलगी व 10 वर्षाचा मुलगा आहे.
आरोपीने दारु पिऊन मुलांना शिवीगाळ करुन मारहाण केली. तसेच मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही तिच्यासोबत गैरवर्तन केले. पीडित मुलीने घडलेला प्रकार तिच्या आईला सांगितल्याने हा प्रकार समोर आला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.