जळगाव दि.२ प्रतिनिधी – जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. (जे. आय. एस. एल.) ज्याचा नोंदणीकृत पत्ता एन. एच. क्रमांक ६, पो. ऑ. बॉक्स ७२, जळगाव, महाराष्ट्र -४२५००१, आणि जैन फार्म फ्रेश फुड्स लिमिटेड (जे. एफ. एफ. एफ. एल.) ज्याचा नोंदणीकृत पत्ता पोस्ट बॉक्स नं. २०, बांभोरी, जळगाव-४२५००१ येथे आहे. या दोन्ही कंपन्या वातावरणातील कार्बनला बायोचारमध्ये रुपांतरीत करण्याचा प्रकल्प सुरू करणार आहे, जेणे करून या प्रकल्पामुळे महाराष्ट्रात आणि आंध्र प्रदेशात पिक काढणीनंतर शेतात उरलेल्या अवशेषांना जाळणे कमी होईल सोबतच अन्न प्रक्रिया क्षेत्रातील कचऱ्याची शाश्वत विल्हेवाट यामुळे लावता येईल.
जैन इरिगेशन आणि जैन फार्म फ्रेश हा प्रकल्प ऐच्छिक कार्बन मार्केट स्टँडर्ड अंतर्गत विकसित करणार आहे. सर्व इच्छुक कर्मचारी, स्थानिक नागरिक, डीलर्स, पुरवठादार, शैक्षणिक संस्था, पर्यावरण आणि कृषी नियामक, स्वयंसेवी संस्था आणि इतरांनी या सभेला उपस्थित राहून आपले योगदान द्यावे असे आवाहन करण्यात येत आहे. ही भागधारकांच्या सभा दिनांक 23 मार्च 2024 रोजी दुपारी १ वा. बडी हांडा हॉल, जैन ॲग्री पार्क, जैन हिल्स, शिरसोली रोड, जळगाव येथे आयोजित केलेली आहे.
यासंबंधीच्या अधिक माहितीसाठी किंवा वरील बैठकीशी संबंधित कोणत्याही तक्रारींचे निराकरण करण्यासाठी, भागधारक आमच्याशी ०२५७-२२६०२८८ अथवा carboncredit@jains.com वर संपर्क साधू शकतात.