जळगाव,(प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनच्या निवडणुकीत जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार व भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष रोहित निकम यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडणुकीसाठी माघारीचा मंगळवारी शेवटचा दिवस होता.
महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनच्या निवडणुकीला गेल्या ७ ते ८ महिन्यापूर्वी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर शासनाने या निवडणुकीला स्थगिती दिली होती. दरम्यान शासनाने निवडणूकची स्थगिती उठल्यानंतर निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करण्यात आला होता त्यानंतर जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार, भाजपाचे रोहित निकम यांच्या समोर एकही अर्ज नसल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात झाली आहे.
या निवडणूकीसंदर्भात उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार, देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन,पालकमंत्री गुलाबराव पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, आमदार मंगेश चव्हाण व आमदार संजय सावकारे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. त्यात नाशिक विभागातून संजय पवार व रोहित निकम यांची सर्वानुमते बिनविरोध निवड झाली.