जळगाव,(प्रतिनिधी) – चारचाकी वाहन चोरी करणारे आरोपीतांना LCB पथकाकडून अटक करण्यात आली असून याप्रकरणी एरंडोल पो.स्टे. CCTNS NO २७/२०२४ भादवि कलम ३७९ मधील चोरी गेलेली ओमीनीचा शोध गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.
डॉ. महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक जळगाव, अशोक नखाते, अपर पोलीस अधीक्षक, जळगाव, कविता नेरकर, अपर पोलीस अधीक्षक, चाळीगसाव, सुनिल नदंवाळकर, उप विभागीय पोलीस अधिकारी अमळनेर यांनी एरंडोल पो.स्टे. CCTNS NO २७/२०२४ भादवि कलम ३७९ मधील चोरी गेलेली ओमीनीचा शोध गुन्हा उघडकीस आणणे बाबत किसन नजनपाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांना आदेश दिले.
त्यावरुन किसन नजनपाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी API अमोल मोरे, PSI गणेश वाघमारे, पोह सुनिल दामोदरे, गोरख बागुल, रफिक शेख, महेश महाजन, संदिप सावळे, नंदलाल पाटील, दर्शन ढाकणे, भगवान पाटील, राहुल बैसाणे, हेमंत पाटील, ईश्वर पाटील, महेश सोमवंशी सर्व नेम. स्थागुशा जळगाव अश्यांचे पथक तयार करण्यात आले होते.
किसन नजनपाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांना गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, सदर गुन्ह्यात चंद्रकांत उर्फ गड्या व त्याचा साथीदार विशाल माळी अयोध्यानगर जळगाव येथे राहत असून कालीपीली चालवून उदरनिर्वाह करीत असतो त्याने सदर चोरी केल्या बाबत बातमी मिळाली, त्यावरून वर पथकास सदर ठिकाणी जावून सशंयीत चंद्रकांत उर्फ गडया याचा शोध घेवून त्यास विचारपुस करून पुढील योग्य ती कारवाई करणे बाबतचे आदेश दिले. त्यावरून वर नमुद पथकाने सशंयीत चंद्रकांत उर्फ गडया व विशाल माळी याचा शेध घेवून अंजिठा चौफुली जळगाव येथून दोघांना ताब्यात घेवून त्यांना त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव १) चंद्रकांत उर्फ गड्या गोरख चौधरी, वय २७, रा. अयोध्या नगर जळगाव, २) विशाल लक्ष्मण माळी वय २५, रा. पारस मेडीकल अयोध्या नगर जळगाव असे सांगीतले. त्यावेळी त्यांना विश्वासात घेवून विचारपूस केली असता त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली असून गुन्ह्यात चोरी केलेली मारुती कंपनीची ओमनी कार काढुन दिल्याने सदरची ओमीनी कार व दोघ आरोपीतांना ताब्यात घेवून एरंडोल पो.स्टे. CCTNS NO २७/२०२४ भादवि कलम ३७९ या गुन्ह्याचे पुढील तपासकामी एरंडोल पो.स्टे. चे ताब्यात देण्यात आले आहे.