राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचा निकाल निवडणूक आयोगाने अजित पवार गटाच्या बाजूने दिल्यानंतर आता शरद पवार गटाला मोठा धक्का मानला जात असतांना सोशल मीडियावर ‘आमचा पक्ष, आमचं चिन्ह शरदचंद्र गोविंदराव पवार असल्याचे पोस्ट केले जात आहे, ज्यामुळे शरद पवार यांना भावनिक साद मिळतांना दिसत आहे.दरम्यान निवडणूक आयोगाच्या या निर्णया नंतर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी माध्यमासमोर पहिली दिली असून हा निर्णय धक्कादायक असल्याचं म्हटलं आहे, ज्या व्यक्तीने राष्ट्रवादी पक्ष उभारला त्या शरद पवार साहेबांच्या हातातून पक्ष हिसकावला जात असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं
निवडणूक आयोगाचा हा निर्णय धक्कादायक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय @PawarSpeaks साहेबांच्या हातातून पक्ष हिसकावून घेतला जातोय. देशातील जवळपास सर्वच संविधानिक संस्थांनी स्वायत्तता गमावली असल्याने तर्कहीन निर्णय देऊन तांत्रिक कारणे पुढे केली…
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) February 6, 2024
निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णया विरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचंही ते म्हणाले.आजपर्यंत शरद पवारांनी अनेकांना उभं केलं, आमच्यासारख्या अनेकांना मंत्रिपदं दिली, आणि आज त्यांच्याच हातातून हा पक्ष काढून घेतला जातोय. आम्ही सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असून न्यायालयाकडून शेवटची अपेक्षा आहे असं जयंत पाटील म्हणाले.या निकालाचा सविस्तर अभ्यास करुन आम्ही त्यावर भाष्य करू. या निकालाला आम्ही सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असून देशाचे सर्वोच्च न्यायालय आम्हाला न्याय देईल याची आम्हाला खात्री आहे.