नैनिताल– हल्दवणी येथे एका २२ वर्षीय तरुणीवर चालत्या कारमध्ये सलग तीन तास सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून शनिवारी सायंकाळी ही धक्कादायक घटना घडली घटनेने परिसरात खळबळ उडाली दरम्यान या प्रकरणातील चार संशयितां विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शनिवार दिनांक ३ फेब्रुवारी रोजी हिरानगर येथून सायंकाळी सात वाजता चार गुन्हेगारांनी एका मुलीचे अपहरण करून चालत्या कारमध्ये तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. तरुणी विरोध करीत राहिली,ओरडत राहिली पण गाडीच्या काचा बंद असल्याने तिचा आवाज बाहेर ऐकू आला नाही या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.संशयितांनी बलात्कार केल्यानंतर या तरुणीला परिसरातील मुखानी चौकाचौकात टाकून पळून गेले. तरुणीच्या तक्रारीवरून चार तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलीस सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची छाननी करून पुढील तपास करीत आहे.
मुखानी पोलीस स्टेशन परिसरात राहणारी 22 वर्षीय तरुणी एका लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी पालम शहराकडे सात वाजण्याच्या सुमारास घरातून निघाली होती. ती ई-रिक्षाने आली आणि सुशीला तिवारी हॉस्पिटलजवळ उतरली. तिला घेण्यासाठी त्याचा भाऊ तिथे येणार होता. बराच वेळ तो न आल्याने तिने आईला फोन केला मात्र कॉल न उचल्यामुळे तिने पायीच हिरानगर चौक गाठला. दरम्यान तिच्याजवळ एक टाटा पंच कार थांबली ज्यामध्ये चार जण प्रवास करत होते. त्यांनी मुलीला कारमध्ये खेचले आणि कार लॉक केली. दारू पिणाऱ्या तरुणांनी तिचा फोन घेतला आणि जबरदस्तीने दारू पाजली, असा आरोप तरुणीने केला आहे.