काल सकाळी अभिनेत्री पूनम पांडेच्या मृत्यूची बातमी इंस्टाग्राम हँडलवर आल्यानंतर सर्वत्र दुःख व्यक्त होतं होतं. अभिनेत्री पूनमच्या मृत्यू झाल्याची एक पोस्ट करण्यात आली होती. ज्यामध्ये लिहिले होतं की, ‘आजची सकाळ आमच्यासाठी खूप कठीण ठरली आहे. आम्हाला कळविण्यात अत्यंत दुःख होत आहे की, गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळे आम्ही पूनमला गमावले आहे. मात्र आज अभिनेत्री पूनमचा मृत्यू झाला नसल्याचे समोर आलं असून पूनम जिवंत असून ठणठणीत आहे.
अभिनेत्रीने शनिवारी दुपारी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला. पूनमने सांगितले की, तिने कॅन्सरबाबत जनजागृती करण्यासाठी स्वतःच्या मृत्यूची बातमी दिली होती.दरम्यान शुक्रवारी ३२ वर्षीय मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडेच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण इंडस्ट्रीत खळबळ उडाली होती. पूनमच्या मृत्यूचे कारण गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग असल्याचे सांगण्यात आले होते.