गेल्या काही वर्षांमध्ये शाळकरी मुलांमध्ये आत्महत्या करण्याचं प्रमाण वाढत चाललंय,अभ्यासाठी आई वडिलांचं सांगणही मुलांना आता त्रास वाटणे,घरगुती टेन्शन,मुलांना लहानपणापासून मोबाईच लागलेले व्यसन आणि यातून मुलांच्या मनावर मोठा परिणाम होतो आहे. यातून मुलं टोकाचं पाऊल उचलताना दिसत आहेत.अशीच एक घटना पुण्यातून समोर आली असून एका ८ वी वर्गात शिक्षण घेणाऱ्या मुलाला आईने अभ्यास कर म्हणून रागावली… मात्र एवढ्या लहानशा कारणाने मुलानं टोकाचं पाऊल उचलत स्वतःला गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.या घटनेनंतर पालक वर्गामध्येही भीतीच वातावरण पसरले आहे.
अभ्यास करत नसतील तर मुलांना आता ओरडायचं पण नाही का असा प्रश्न पालकांना पडला असून कुठल्या गोष्टीसाठी नाही म्टहलं तर मुलं काही तरी करतील या भीतीने अनेक पालक मुलांच्या इच्छा पूर्ण करताना दिसत आहेत.आईने अभ्यास करण्यासाठी रागावल्याने हा राग मनात ठेवून ८ वी वर्गात शिकणाऱ्या जतीन ने स्वतःला गळफास लावून ३१ जानेवारी रोजी संध्याकाळी ५ वाजता ही घटना घडली.
वडील कामावरून आल्यावर जतीन आतल्या खोलीत नेमकं काय करतोय, तो दरवाजा का उघडत नाही. हे पाहण्यासाठी वडिलांनी त्या खोलीच्या मागच्या दारातून त्यांनी पाहिल त्यावेळी मुलाला असं पाहून आई वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली. वडील कसंबसं त्या खोलीत शिरले आणि त्यांनी जतिनला खाली उतरून जतीनला तात्काळ पुण्यातील रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र त्याचा मृत्यू झाल्याच डॉक्टरांनी सांगितलं. या घटनेमुळे घरावर दु:खाचं डोंगर कोसळला आहे.