पुणे : वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने एका १५ वर्षीय मैत्रिणीला बोलावलं खरं पण तीच्या मर्जी विरुद्ध तीला निर्जनस्थळी नेत तिच्यावर तिच्याच मित्रांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना सोमवारी उघडकीस आली आहे.आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बलात्कारासह POCSO कायद्यान्वय गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान दोन आरोपीना अटक करण्यात आली आहे.
मैत्रीला काळिमा फासणारी घटना पुण्यात घडली असून हडपसर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपीनी मुलीला वाढदिवसाच्या पार्टीचे सांगून तीला पुणे नजीक असलेल्या मुळा नदीच्या काठावर नेलं तिथं तीच्या मर्जी विरुद्ध तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.दरम्यान पीडित मुलीने घरी आपबीती सांगितल्या नंतर पीडितीच्या तक्रारीवरून हडपसर पोलिसांनी 30 जानेवारी रोजी गुन्हा दाखल केला.
आरोपींपैकी एक ऑनलाइन किराणा कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो तर दुसरा ससून जनरल हॉस्पिटलमध्ये कर्मचारी आहे.15 वर्षीय पीडितेच्या तक्रारीनुसार, 29 जानेवारी रोजी दोन आरोपी आणि त्याचा एक मित्र असे एकूण चार जण मोटारसायकलवरून बाहेर पडले होते.पीडितेच्या म्हणण्यानुसार, संध्याकाळी 6:30 ते 8:30 दरम्यान दोन्ही आरोपींनी तिच्यावर एकामागून एक बलात्कार केला. पीडितेने विरोध केला असता, दोन्ही आरोपींनी तिला मारहाण करून जबरदस्ती केली.