जळगाव : शिक्षण क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल जी.एच.रायसोनी इन्स्टिट्यूट अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविध्यालयाच्या संचालिका प्रा.डॉ.प्रिती अग्रवाल यांना भरारी फाउंडेशनतर्फे सागर पार्क येथे आयोजित बहिणाबाई महोत्सवात यंदाचा “बहिणाबाई शैक्षणिक विशेष सन्मान पुरस्कार” देवून गौरविण्यात आले. खासदार उन्मेष पाटील व आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला तसेच सन्मानपत्रही यावेळी देण्यात आले.
प्रा.डॉ. प्रिती अग्रवाल यांचे विविध शैक्षणिक उपक्रमांत भरीव योगदान आहे. समाजातील प्रत्येक विध्यार्थ्यास सक्षम बनविणे हि आपली सर्वांची नैतिक जबाबदारी असून त्या अनुषंगाने विध्यार्थ्यांना विकासाभिमुख बनविण्याच्या कार्यासाठी त्या सदैव अथक परिश्रम घेत असतात. खान्देशातील ऑटोनॉमस महाविद्यालयाच्या नावांची यादी घेतल्यास त्यात अभियांत्रिकी व मॅनेजमेंट क्षेत्रातील ऑटोनॉमस महाविद्यालय म्हणून अग्रक्रमाने येते जी. एच. रायसोनी महाविद्यालयाचे नाव, नॅककडून जी. एच. रायसोनी महाविद्यालयाला स्वायत्ततेचा दर्जा प्राप्त होण्यासोबतच ते “ए” ग्रेडने देखील सन्मानित झाले असून यामागे रायसोनी महाविद्यालयाच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांचे अथक परिश्रम व असीम कार्यकर्तृत्व आहे.
तसेच विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या भावनेतून विविध कार्यशाळा व उपक्रम त्या आयोजित करीत असतात. तसेच उद्याच्या भारतातील भावी नागरिक शिक्षणाच्या माध्यमातून घडविण्याच्या त्यांच्या अद्वितीय कार्याची दखल घेवून त्यांना हा गौरव पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांचे जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी यांच्यासह त्यांचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.