मुंबईतील विमानतळावर विमानात बसलेल्या एका प्रवाशाने त्याच्या सीटखाली बॉम्ब असल्याची ओरड केली. हे ऐकून सर्व प्रवासी घाबरले आणि त्यांनी तात्काळ नियंत्रण कक्षाला माहिती दिली. यानंतर फ्लाइटचे वेळापत्रक रीशेड्युल करण्यात आले आणि सुरक्षा यंत्रणांनी चेकिंग केले. तपासणीदरम्यान फ्लाइटमध्ये कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. या संपूर्ण घटनेत अफवा पसरवणाऱ्या प्रवाशाला अटक करण्यात आली असून त्याची चौकशी करण्यात येत आहे.