मुंबई,(प्रतिनिधी)– अयोध्येत होणाऱ्या राम मंदिराच्या (Ram Mandir) प्राणप्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून (State Government) सोमवार दिनांक २२ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांना अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे संपूर्ण देशभरात राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळा निमित्त उत्साह पाहायला मिळत असून सर्वत्र उत्सव साजरा करण्यात येतं त्याचसाठी राज्य सरकारकडून हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळा येत्या २२ जानेवारीला पंतप्रधानांच्या हस्ते पार पडणार आहे. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देशभरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सलग चार दिवस सुट्या
हजरत मोहम्मद अली यांच्या जयंतीनिमित्त गुरुवार दिनांक २५ जानेवारी रोजी बँकेला सुट्टी असणार आहे. त्यानंतर प्रजासत्ताक दिनानिमित्त दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवार २६ जानेवारीला बँका बंद राहतील. २७ जानेवारी हा महिन्याचा चौथा शनिवार आहे आणि त्यानंतर २८ जानेवारी रविवार आहे. २५ जानेवारी ते २८ जानेवारी असे सलग चार दिवस बँका बंद राहणार आहेत. २१ जानेवारीपासून पुढील ८ दिवस बँका फक्त 2 दिवस सुरू राहतील आणि 6 दिवस सुट्या असतील.